खेड रेल्वे स्टेशनच्या स्टॉप पिकअप शेडजवळ ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. किरण दगडू जाधव (वय ४१, मूळ रा. कळंबणी खुर्द, पिंपळवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी; सध्या रा. पटवर्धन, लोटे-आवाशी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरण जाधव यांना दारूचे व्यसन होते तसेच त्यांना वारंवार फिट येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. १ ऑक्टोबर रोजी ते दुपारी सुमारे १२ वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे त्यांचा लहान भाऊ नितीन जाधव यांच्यासोबत होते. त्यानंतर ते रुग्णालयात परत गेले नसल्याचे कुटुंबीयांच्या माहितीतून समोर आले.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्टेशन स्टॉप पिकअप शेडच्या बाजूला एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. याबाबत वेरळचे पोलीस पाटील संजय शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्याला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील संजय शिंदे यांनी १०८ रुग्णवाहिकेलाही माहिती देऊन घटनास्थळी बोलावून घेतले. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी घटनास्थळी किरण जाधव यांची तपासणी केली. तपासणीनंतर रात्री १० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद २ ऑक्टोबर रोजी पहाटे २.५४ वाजता खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. किरण जाधव यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील कार्यवाही व तपास करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













