चिपळूण : 37 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात हळहळ

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील टेरव येथील वेतकोंडवाडी येथे ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (१ ऑक्टोबर) घडली. सुनील सीताराम बोलाडे (वय ३७, रा. टेरव वेतकोंडवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बोलाडे यांना दारूचे व्यसन होते. १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घरात अन्य कोणी नसताना त्यांनी राहत्या घरातील पडवीच्या लोखंडी चॅनेलला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी मृताचे बंधू पांडुरंग सीताराम बोलाडे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यू क्रमांक ५९/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे टेरव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *