अंमली पदार्थांच्या तस्करी व विक्रीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून सुरू असलेल्या ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. भाटे समुद्रकिनारी स्मशानभूमीजवळ संशयास्पदरीत्या आढळलेल्या एका इसमाकडून विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला गांजा जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना भाटे समुद्रकिनारी स्मशानभूमीजवळ एक इसम संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्याकडे गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे ₹35,000 किंमतीचा गांजा जप्त केला आहे. सदर गांजा विक्रीच्या उद्देशाने बाळगण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शेषराव शिंदे, प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विनोद कदम आणि विक्रम पाटील यांच्या पथकाने केली.
अंमली पदार्थांविरोधात ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू असून, शहरासह जिल्ह्यातील संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवले जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













