खेड : तालुक्यातील कुंभारआळी येथे २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. समाधान गोविंद शिंदे (वय २८, रा. कुंभारआळी, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान याला दारू पिण्याचे व्यसन होते. ८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान त्याने दारूच्या नशेत अज्ञात कारणातून घरातील लाकडी भाल्याला कपडे सुकवण्यासाठी बांधलेल्या काळ्या रंगाच्या केबलच्या सहाय्याने गळफास घेतला.
ही बाब लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ९ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे ००.३० वाजता त्याला मृत घोषित केले.
या घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ७२/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













