Breaking News
खेड : 28 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या रत्नागिरीत आजारपणामुळे ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू खेड : फरूस-आमशेत येथे घरफोडी, छतावरील कौले काढून अज्ञात चोरट्याने घर साफ केले दाभोळ : भिवबंदर (आगरी ) परिसरात 2.800 मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प, 44 हजार कोटींची गुंतवणूक, जेएसडब्ल्यू एनर्जीसोबत महाराष्ट्र शासनाचा सामंजस्य करार, 8 ते 10 हजार रोजगारांची शक्यता, दापोली आणि रत्नागिरीच्या ऊर्जा क्षेत्राला मोठी झेप रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत कडेकोट पोलीस बंदोबस्त, 58 अधिकारी, 650 अंमलदार तैनात, विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्र किशोर मीणा यांचा जिल्हा दौरा, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची उपस्थिती महामार्गावरील 14 फिक्स पॉइंटची पाहणी

रत्नागिरीत आजारपणामुळे ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी : दीर्घकाळापासून आजारी असलेल्या ३६ वर्षीय तरुणाचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना ८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शरद शांताराम खापरे (वय ३६, रा. खेडशी डफळचोळ, खापरेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद खापरे यांना लहानपणापासूनच फिट येण्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती वारंवार बिघडत होती. तसेच त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती नातेवाइकांनी पोलिसांना दिली आहे. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

१ सप्टेंबर रोजी प्रकृती ठीक नसल्याने शरद हे कारवांचीवाडी फाटा येथील डॉ. पानगले यांच्याकडे तपासणीसाठी गेले होते. तपासणीदरम्यान त्यांच्या छातीत पाणी झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते.

दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता शरद यांची प्रकृती अचानक अधिक खालावली. त्यांची पत्नी श्रावणी खापरे यांनी त्यांना वाडीतील रिक्षाने नाचणे रोड येथील डॉ. सांबरे यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

त्यानुसार शरद यांना सकाळी सुमारे ११ वाजता सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रात्री ११.४६ वाजता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद केली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *