दापोली बाजारपेठेत सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने मालवाहू ट्रक उभे करून निघून जाणाऱ्या दोन चालकांविरोधात दापोली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली घटना ४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३६ वाजण्याच्या सुमारास दापोली बाजारपेठेतील भारत वॉच सेंटरसमोरील सार्वजनिक रस्त्यावर घडली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गु.र. नं. १९०/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कैलास क्षीरसागर यांनी फिर्याद दिली. संबंधित चालकाने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक MH-12-AQ-1323 सार्वजनिक रस्त्यावर अशा स्थितीत उभा केला की, ये-जा करणाऱ्या वाहनांना व नागरिकांना अडथळा निर्माण झाला तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता होती. ट्रक उभा करून चालक तेथून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दुसरी घटना त्याच दिवशी दुपारी १२.५५ वाजण्याच्या सुमारास दापोली बाजारपेठेतील मारुती मंदिरासमोरील प्लाझावरून नटराज नाक्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर घडली.
या प्रकरणी गु.र. नं. १९१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कृतज्ञ दीपक कडोले (वय २८, रा. हेळवाक, ता. पाटण, जि. सातारा) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कडोले याने त्याच्या ताब्यातील टाटा कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक MH-43-Y-7220 सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल आणि पादचाऱ्यांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभा केला होता. ट्रक उभा करून तो तेथून निघून गेल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
दोन्ही प्रकरणांत दापोली पोलिसांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













