चिपळूणमध्ये अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरोधात जनजागृती करण्यासाठी चिपळुणात लावण्यात आलेल्या अनोख्या बॅनरची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. ‘जागरूक व्हा, नवीन पिढीला वाचवा’ असा संदेश देत नागरिकांना अमली पदार्थांविरोधात पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बॅनरवर ‘SAY NO TO DRUGS’ असा ठळक संदेश देण्यात आला असून गांजा, चरस, व्हाईट पावडर, ब्राऊन शुगर तसेच मद्य आणि इतर अमली पदार्थांच्या सेवन व विक्रीविरोधात जनजागृती करण्यात आली आहे.

अमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तींबाबत व्हिडीओच्या माध्यमातून माहिती देणाऱ्या जागरूक नागरिकांचा जाहीर सत्कार करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
‘सर्व अमली पदार्थांची दुकाने बंद करा, चिपळूणचे जागरूक नागरिक व्हा आणि पोलिस प्रशासनाला मदत करा’, असा संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे.

हा उपक्रम साजिद सरगुरोह, नगरसेवक व गटनेता, चिपळूण नगर परिषद तसेच रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्या वतीने राबवण्यात आल्याचे बॅनरवर नमूद करण्यात आले आहे.
अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येविरोधात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













