चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरातील खेरशेत येथील हॉटेल पंचामृतमध्ये दारूच्या नशेत फ्रिजवर झोपलेल्या 54 वर्षीय व्यक्तीचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ३१ ऑगस्ट रोजी घडली.
मयताचे नाव के. व्ही. रागेश (वय ५४) असून ते मूळचे केरळ राज्यातील रहिवासी होते. सध्या ते खेरशेत येथील हॉटेल पंचामृत येथे राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रागेश हे हॉटेलमध्ये काम करत होते. दारूचे सेवन करून आल्यानंतर ते हॉलमधील बंद फ्रिजवर झोपत असत. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.१२ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत असताना त्यांचा फ्रिजवरून तोल गेला आणि ते खाली पडले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची खबर त्यांच्यासोबत काम करणारे व मित्र विशाल अनंत कदम यांनी दिली. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













