Breaking News
दापोली : दसऱ्यानिमित्त दापोलीत ऑनलाइन भोंडला स्पर्धा, दशानेमा गुजर युवक संस्थेचा उपक्रम, दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील महिलांना सहभागाची संधी चिपळूण : डी.बी.जे. कॉलेजसमोरील रस्त्यावर गतिरोधक बसवा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी युवासेनेची मागणी, जुने गतिरोधक सपाट झाल्याने अपघाताचा धोका; राष्ट्रीय महामार्ग उपविभागाला निवेदन चिपळूण : शहर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रुही खेडेकर चिपळुण : गावठी दारूच्या हातभट्टीवर पोलिसांचा छापा, 1 लाख 48 हजारांचा मुद्देमाल नष्ट रत्नागिरीत नात्याला काळिमा, मावशीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, भाचीवर अत्याचार, तरुणाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा

दापोलीच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय क्रीडा अधिवेशनात गौरव, कविता शिंदेंना ‘हिंदरत्न’, तिघांना ‘सुवर्णलक्ष’ पुरस्कार

banner 468x60

दापोलीतील खेळाडू विद्यार्थ्यांनी लाठीकाठी व दांडपट्टा या पारंपरिक क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर दापोलीचे नाव उंचावले आहे. ३० ऑगस्ट २०२६ रोजी मिरज (सांगली) येथील बालगंधर्व नाट्यगृहात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन २०२६ मध्ये दापोलीतील खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला.

मा. राजू शेट्टी, माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या अधिवेशनात अनय बाळ, वैष्णवी मिसाळ आणि अमोल धयाळकर यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय लाठीकाठी व दांडपट्टा स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल ‘सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.

याच कार्यक्रमात कविता शिंदे यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘हिंदरत्न शेर-ए-हिंदुस्थान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींना लाठीकाठी तसेच महाराष्ट्राच्या पारंपरिक ‘दांडपट्टा’ या खेळाचे प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे कार्य कविता शिंदे करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत मेजर ध्यानचंद केंद्रीय क्रीडा समिती, नवी दिल्ली (भारत) यांच्या वतीने त्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सर्व खेळाडूंना कराटेचे आंतरराष्ट्रीय खेळाडू तसेच लाठी-दांडपट्टा खेळाचे राष्ट्रीय पंच सुरेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

दापोलीतील या खेळाडूंच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *