सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी २९ ऑगस्ट रोजी चार स्वतंत्र कारवाया करत चौघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
दापोली एस.टी. स्टँडच्या आवारात सकाळी ११.५२ वाजता वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सुधीर अनंत बुरटे (वय ३५, रा. जालगाव पांगारवाडी, ता. दापोली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी गु.र.नं. १८२/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम २८५ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
त्यानंतर दापोली-खेड मुख्य मार्गावर दुपारी १२.०१ वाजता वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कैलास सयाजी माने (वय ४६, रा. नानटे जांभुळवाडी, ता. दापोली) याच्याविरोधात गु.र.नं. १८३/२०२६ दाखल करण्यात आला.
तसेच दापोली-खेड मुख्य मार्गावरील तुलशी दुकानासमोर दुपारी १२.०९ वाजता अडथळा निर्माण केल्याप्रकरणी विनोद विलास धोपट (वय ४०, रा. लष्करवाडी, जालगाव, ता. दापोली) याच्याविरोधात गु.र.नं. १८४/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दापोली-मंडणगड मुख्य मार्गावरील ए.के. इलेक्ट्रिकल दुकानासमोर दुपारी १२.२० वाजता वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संतोष चंद्रकांत होळकर (वय ३२, रा. बाणकोट कोळीवाडा, ता. मंडणगड) याच्याविरोधात गु.र.नं. १८५/२०२६ दाखल करण्यात आला.
याशिवाय दापोली बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ए.के. इलेक्ट्रिकल दुकानासमोर दुपारी १२.३८ वाजता वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अविनाश विश्वास शिर्के (वय ४७, रा. मुंढर-शृंगारतळी, ता. गुहागर) याच्याविरोधात गु.र.नं. १८६/२०२६ नुसार कारवाई करण्यात आली.
या सर्व प्रकरणांमध्ये दापोली पोलीस ठाण्याचे पोहेकॉ नंदकुमार श्रीपत घाणेकर यांनी फिर्याद दिली आहे. सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात दापोली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











