दापोली : कल्याण मटका जुगारावर पोलिसांची कारवाई

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठेत पानटपरीच्या मागील बाजूस आडोशाला अवैध कल्याण मटका जुगार खेळविताना एका व्यक्तीला दापोली पोलिसांनी पकडले. ही कारवाई २८ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

हर्णे बाजारपेठेतील पाटील खानावळ हॉटेलसमोरील गल्लीत एका पानटपरीच्या मागील बाजूस स्पेश सुधाकर तवसाळकर (वय ४९, रा. पाळंदे, ता. दापोली) हा विनापरवाना कल्याण मटका जुगार खेळविताना आढळून आला. त्याच्याकडे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम आढळून आली.

याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १७४/२०२६, महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचारी दिलीप बाळकृष्ण नवाले (वय ३५) यांनी याबाबत फिर्याद दिली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत १,१२० रुपये रोख रक्कम व इतर जुगार साहित्य असा एकूण १,१३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *