दापोली : एसटी स्थानकात दारूच्या नशेत कठड्यावरून पडलेल्या मुंबईतील व्यक्तीचा मृत्यू

banner 468x60

दापोली एसटी बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत कठड्यावरून खाली पडलेल्या मुंबईतील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २८ ऑगस्ट रोजी रात्री घडली. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदन आत्माराम महाडीक, रा. वल्लभभाई पटेल नगर, जी-ब्लॉक, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, हे २८ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास दापोली एसटी स्थानकातील कॅन्टीनलगत असलेल्या प्रवासी बसण्याच्या शेडमध्ये शेवटच्या कडाप्पाच्या कठड्याजवळ पडलेल्या अवस्थेत आढळून आले.

महाडीक यांनी दारूचे सेवन केले असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. कठड्यावरून खाली पडल्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी रात्री ११.५५ वाजण्याच्या सुमारास तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

या घटनेची माहिती एसटी महामंडळाचे दापोली येथील वाहतूक नियंत्रक किरण गोविंद शिगवण यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या खबरवरून दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ६२/२०२६, बीएनएसएस कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.


मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल (पीएम नोट्स) प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र नलावडे करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *