दापोली तालुक्यातील केळशी मोहल्ला येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून आठ जणांनी एकाला मारहाण केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या व्यक्तींनाही मारहाण करण्यात आल्याचे पोलिस तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास केळशी मोहल्ला येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ फिर्यादी रिजवान दाऊद अलबा (३२, व्यवसाय मच्छीमारी, रा. केळशी नबी मोहल्ला) यांचे आरोपी रियाज अली बोरकर याच्यासोबत भांडण झाले.
या भांडणाच्या कारणावरून रियाज अली बोरकर याच्यासह कबीर इलियास चाऊस, अली इलियास चाऊस, समीउल्ला फराज चाऊस, इलीयास अली चाऊस, फईम इलियास चाऊस, जमशीद इलियास चाऊस आणि वहीद आशिफ खमसे या आठ जणांनी रिजवान अलबा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
रियाज बोरकर याने रिजवान यांच्या डाव्या डोळ्यावर हाताच्या ठोशाने मारून दुखापत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच इतर आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी रियाज बोरकर याने “तुला आज संपवतो” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
रिजवान यांना सोडविण्यासाठी त्यांचे मित्र अबरार इस्माईल डायली, रियान इकबाल चाऊस, नाजीम इकबाल डायली, तसेच त्यांची आई हमीदा दाऊद अलबा आणि मेव्हणे मसूद शरीफ बोरकर हे आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या मारहाणीत मसूद शरीफ बोरकर यांच्या उजव्या गालावर दुखापत झाली.
या प्रकरणी २७ ऑगस्ट रोजी दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७१/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कलम १८९(२), १९०, ११५(२), ३५१(२) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दापोली पोलिस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













