दापोली शिवसेनेच्या प्रभारी शहरप्रमुखपदी सुनील रिसबूड यांची नियुक्ती

banner 468x60

दापोली : शिवसेना पक्षाच्या दापोली शहराच्या प्रभारी शहरप्रमुखपदी सुनील शंकर रिसबूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत त्यांच्याकडे प्रभारी शहरप्रमुखपदाची जबाबदारी राहणार आहे. या नियुक्तीमुळे दापोली शहरातील शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार सुनील रिसबूड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आले असून, दापोली शहर हे त्यांच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे.

banner 728x90

नियुक्तीपत्रात रिसबूड यांच्यावर पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार तसेच धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण यांचा प्रचार व प्रसार करण्यासह सर्वांना सोबत घेऊन पक्षाच्या वाढीसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दापोली शहरातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविणे, अशी महत्त्वाची जबाबदारी रिसबूड यांच्यावर असणार आहे. पक्षांतर्गत निवडणुकांपर्यंत त्यांची नियुक्ती राहणार असल्याने या कालावधीत शहरातील पक्ष संघटना अधिक सक्रिय करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

सुनील रिसबूड यांच्या नियुक्तीचे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दापोली शहरात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *