लांजातील ४२ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

लांजा तालुक्यातील रावारी भोसलेवाडी येथील ४२ वर्षीय प्रमोद तकाराम आग्रे यांचा रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद आग्रे यांना दारूचे व्यसन होते. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.१५ वाजता त्यांची बहीण कांचन हिने त्यांचे भाऊ विनोद तकाराम आग्रे यांना फोन करून प्रमोद यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रत्नागिरी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती दिली.

त्यानंतर विनोद आग्रे हे भावाला पाहण्यासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये गेले असता प्रमोद यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरू होते.

मात्र, २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८.२३ वाजता आयसीयू विभागात उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून प्रमोद आग्रे यांना मृत घोषित केले.

या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ४५/२०२६ म्हणून करण्यात आली असून, BNSS कलम १९४ अन्वये नोंद झाली आहे. सदर नोंद २१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.२७ वाजता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *