मंडणगड : मंडणगडमध्ये घरातून 8 लाख 40 हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला

banner 468x60

मंडणगड तालुक्यातील दहागाव जाधववाडी येथे घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉक चावीने उघडून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजल्यापासून ७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंतच्या कालावधीत फिर्यादी रविंद्र विष्णू जाधव (वय ४५, रा. दहागाव जाधववाडी, ता. मंडणगड) यांच्या घरी घडली.

फिर्यादी यांच्या घरातील बेडरूममधील कपाटाचे लॉक चावीच्या सहाय्याने उघडण्यात आले. त्यानंतर कपाटातील त्यांच्या पत्नीचे काळ्या मण्यांमधील सुमारे ६ तोळे (६० ग्रॅम) वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ज्याची किंमत अंदाजे ८ लाख ४० हजार रुपये आहे, लबाडीच्या इराद्याने चोरून नेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पवन संभाजी सुतार (वय २७, रा. चांदेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ९४/२०२६ असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९.१३ वाजता दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *