चिपळूण तालुक्यातील ३० वर्षीय महिलेने गोळ्यांची पावडर व हिरव्या पेस्टसारखा पदार्थ प्राशन केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या ३० वर्षीय महिलेचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वृषाली जगन्नाथ दैवज्ञ असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, वृषाली दैवज्ञ यांनी १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या दरम्यान कोणत्या तरी गोळ्यांची पावडर आणि हिरव्या पेस्टसारखा पदार्थ प्राशन केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने प्रथम चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांना डेरवण, सावर्डे येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी त्यांना वालावलकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मात्र उपचारादरम्यान १५ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ४.५० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद क्रमांक ५२/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे.
मृत वृषाली दैवज्ञ या सध्या खेड येथे गणपती मंदिराजवळ राहत होत्या. त्यांचे मूळ गाव सोमेश्वर, ता. जि. रत्नागिरी असल्याची पोलिस नोंद आहे. मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी व पुढील अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













