चिपळूण येथे त्वचाविकार आणि कॉस्मेटोलॉजी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना चिपळुणातील स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी लेसर क्लिनिकने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अमेरिकन तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक ‘टोटल स्काल्प अँड फेस अॅडव्हान्स्ड AI अॅनालायझर’ आता कोकणवासीयांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या अत्याधुनिक यंत्रणेमुळे त्वचा, केस आणि टाळूच्या समस्यांचे अधिक सखोल व वैज्ञानिक पद्धतीने डिजिटल विश्लेषण करता येणार आहे. विशेषतः केसगळती, टाळूचे विकार, कोंडा, केस पातळ होणे तसेच विविध त्वचा आणि सौंदर्यविषयक समस्यांचे परीक्षण करण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.
या उपकरणामध्ये हाय-रिझोल्यूशन मायक्रोस्कोपिक कॅमेरा आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. व्हाईट, पोलराइज्ड आणि अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाच्या माध्यमातून त्वचा व केसांमधील सूक्ष्म बदलांचे डिजिटल विश्लेषण केले जाते. केसांची मुळे, टाळूची स्थिती, केसांची घनता, केसांची जाडी आणि त्वचेचे आरोग्य यांचे बारकाईने परीक्षण या माध्यमातून करता येते.
केसगळतीचे प्रमाण, कोंडा, टाळूवरील अतिरिक्त तेलकटपणा किंवा कोरडेपणा, बंद झालेले हेअर फॉलिकल्स, टाळूवरील दाह व लालसरपणा, नवीन केसांची वाढ तसेच केस पातळ होण्याची प्रवृत्ती यांचे निरीक्षण या प्रणालीद्वारे करता येते. तपासणीनंतर रुग्णाला केसांची घनता, टाळूच्या आरोग्याची स्थिती आणि केसगळतीशी संबंधित निरीक्षणांचा समावेश असलेला डिजिटल अहवाल मिळतो.
उपचार सुरू करण्यापूर्वी आणि उपचारानंतरच्या स्थितीची तुलना करण्यासाठी डिजिटल छायाचित्रे व विश्लेषणाची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे उपचाराच्या प्रगतीचे अधिक व्यवस्थित निरीक्षण करण्यास मदत होणार आहे.
याबाबत माहिती देताना त्वचाविकार व लेसर उपचारतज्ज्ञ डॉ. यतिन जाधव म्हणाले की, केसगळती किंवा त्वचेच्या समस्या वाढण्याची वाट न पाहता सुरुवातीच्या टप्प्यात अचूक तपासणी करणे महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, हे AI आधारित उपकरण निदान प्रक्रियेला पूरक साधन असून अंतिम वैद्यकीय निदान व उपचारांचा निर्णय तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतरच घेतला जातो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी लेसर क्लिनिकमध्ये यापूर्वीपासूनच त्वचा व केसांसाठी विविध आधुनिक उपचार तसेच लेसर तंत्रज्ञानाच्या सुविधा उपलब्ध आहेत. आता अत्याधुनिक AI अॅनालायझरची भर पडल्याने त्वचा, केस आणि टाळूच्या समस्यांचे विश्लेषण अधिक आधुनिक पद्धतीने करण्याची सुविधा चिपळूणसह कोकणवासीयांना उपलब्ध झाली आहे.
क्लिनिकचा पत्ता : स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी लेसर क्लिनिक, जेड गार्डन, ‘स्वरविहार’ गृहसंकुल, पिंपळ गणेश मंदिराजवळ, खेंड, चिपळूण.
दूरध्वनी : (०२३५५) २६१२३४ / २६०६७७
मोबाईल : ९७३०९०६२१६ / ७९९८४९४९४९ / ९६७३९५६५१४ / ८४४६२५८६४० / ७५८८४७७६९०

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













