Breaking News
दापोली : दापोली वक्फ जमीन व्यवहाराला नवे वळण, जमीन व्यवहार प्रकरणी दापोली उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांची बाजू समोर, ‘माझे सर्व कागदपत्रे क्लिअर, वक्फ बोर्डाच्या जमिनीचे खरेदीखत होत नाही, मी जागा पाहून घेतली’ – खालिद रखांगे यांची कोकण कट्टा न्यूजला माहिती राजापूर : गवतात पडलेल्या महावितरणच्या विजेच्या तारेला स्पर्श, शेतकऱ्याचा जागीच मृत्यूमहावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात ग्रामस्थ संतप्त रत्नागिरी : भरधाव ॲक्टिव्हाची महिलेला जोरदार धडक, गंभीर जखमी करून चालक पसार गुहागर : ग्रामदेवतेच्या मंदिरातून 32 हजारांचे दोन अॅम्प्लिफायर चोरीला राजापूर : दिवसा घरफोडी, कुलूप तोडून 12 हजारांचे चांदीचे साहित्य लंपास

दापोली : बोरिवली-आडीवाडीत झाड कोसळून रस्ता अन् वीजपुरवठा ठप्प; ग्रामस्थांनी युद्धपातळीवर हटवला अडथळा

banner 468x60

बोरिवली (आडीवाडी) : प्रतिनिधी – सागर गोवळे

पहाटेच्या सुमारास बोरिवली-आडीवाडी येथील मुख्य रस्त्यालगत असलेले मोठे झाड अचानक कोसळून वीजवाहिनीवर पडल्याची घटना घडली. झाड वीजतारांवर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली, तसेच परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. झाड वीजवाहिनीवर अडकल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता बोरिवली-आडीवाडीतील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत कुऱ्हाडी, करवती आणि दोऱ्यांच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या व खोड हटवण्याचे काम हाती घेतले.

वीजवाहिनीवर झाड पडल्याने धोका लक्षात घेऊन आवश्यक खबरदारी घेत ग्रामस्थांनी मोठ्या फांद्या कापून बाजूला केल्या. त्यानंतर रस्त्यावर पडलेले खोड व फांद्या हटवून मुख्य रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. तसेच वीजतारांवरील झाडाचा भार कमी केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काम करणे सुलभ झाले.

ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे अवघ्या काही वेळातच रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला. संकटाच्या प्रसंगी प्रशासनाची वाट न पाहता ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद ठरत आहे.

बोरिवली-आडीवाडी ग्रामस्थांनी दाखवलेल्या या एकजुटीमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली असून, गावकऱ्यांच्या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *