दापोली तालुक्यातील रामराजे महाविद्यालय, दापोली आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी ‘बँकिंग व सहकार क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

स्वच्छता अभियानादरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी शहरातील विविध परिसरांची स्वच्छता करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती केली. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यानंतर महाविद्यालयात आयोजित व्याख्यानासाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (RDC Bank) दापोली शाखेच्या उपव्यवस्थापक स्वप्नाली कालेकर प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना बँकिंग व सहकार क्षेत्रातील करिअरच्या विविध संधी, स्पर्धा परीक्षांची तयारी, तसेच या क्षेत्रातील आव्हाने आणि भविष्यातील संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वेदिका राणे, प्रा. कुणाल मंडलिक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष येसावरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. अंकिता दळवी, प्रा. प्रीती सकपाळ तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्मिता बैकर यांनी केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













