काल रात्रीपासून बेपत्ता असलेला 17 वर्षीय सैफ निसार शिरगावकर सुखरूप घरी परतला

banner 468x60

नवी मुंबईतील तळोजा फेज-2 येथून बेपत्ता झालेला 17 वर्षीय विद्यार्थी सैफ निसार शिरगावकर अखेर सुखरूप घरी परतला आहे. काल रात्रीपासून सैफचा संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते.

सैफ हा तळोजा फेज-2, सेक्टर 24 येथील अरकान अॅव्हेन्यू परिसरात शिक्षणासाठी राहत होता. 20 जुलै रोजी रात्री सुमारे 8 वाजता तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद असल्याने आणि संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती.

कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांकडे चौकशी करत त्याचा शोध सुरू केला होता. नागरिकांकडूनही सैफबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सैफ आता सुरक्षितपणे घरी परतला असून कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *