दापोली तालुक्यातील गिम्हवणे येथील आझादवाडी परिसरातील एका वृद्धाचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. यशवंत सखाराम भुवड (वय …) असे मृत वृद्धाचे नाव असून, त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत भुवड यांना रक्तदाबाचा त्रास होता. 19 जुलै रोजी रात्री त्यांनी नेहमीप्रमाणे जेवण करून झोप घेतली. मात्र, 20 जुलै रोजी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचे भाऊ विनायक रामचंद्र भुवड यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आले.
घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने त्यांना दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती विनायक रामचंद्र भुवड यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या खबरीवरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, दापोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













