Breaking News
दापोली : गिम्हवणे केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न HPV लसीकरणाबाबत शंकांचे निरसन, मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित रत्नागिरी : गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा बंद, अवघ्या 10 दिवसांत प्रशासनाचा निर्णय रत्नागिरी : एमआयडीसी मिरजोळेत बंद घर फोडले; सोन्याचे दागिने, रोकड आणि डॉलर असा 8.73 लाखांचा मुद्देमाल लंपास खेड : घरात कपडे धुत असलेल्या 65 वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली, खेडमध्ये दोघांवर गुन्हा दाखल चिपळूण : फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी 10 हजारांची लाच प्रकरणी मंडळ अधिकाऱ्याला एक दिवसाची पोलीस कोठडी, उमेश राजेशिर्के यांच्या मालमत्ता व आर्थिक व्यवहारांचीही होणार चौकशी

रायगड : श्रीवर्धनमध्ये 35 लाखांचा चरस जप्त; 63 वर्षीय तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

banner 468x60

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे अमली पदार्थांविरोधातील मोठ्या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३४ लाख ९८ हजार रुपये किमतीचा ६.९९६ किलो चरस जप्त करत ६३ वर्षीय तस्कराला अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात कार्यरत असलेल्या अमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे.

श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट वाहतूक करणारे काही चालक चरस व गांजाच्या नशेत वाहने चालवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली.

१८ जुलै २०२६ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, सादिक इब्राहीम शेखदरे (वय ६३, रा. शेखाडी) हा चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शेखाडीजवळील कोंडीवली स्मशानभूमी परिसरात सापळा रचला.

यावेळी MH-06-CD-6700 क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या सादिक शेखदरे याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, दुचाकीच्या डिकीमध्ये २ किलो १४६ ग्रॅम चरस आढळून आला. या चरसाची किंमत १० लाख ७३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पोलीस कोठडीत झालेल्या चौकशीत आरोपीने शेखाडी येथील एका बंद फायबर बोटीत आणखी चरस लपवून ठेवल्याची कबुली दिली. पोलिसांनी तेथे छापा टाकून ४ किलो ८५० ग्रॅम चरस जप्त केला. या साठ्याची किंमत २४ लाख २५ हजार रुपये आहे.

या कारवाईत एकूण ६.९९६ किलो चरस (किंमत ₹३४.९८ लाख), एक मोटरसायकल आणि एक मोबाईल फोन असा सुमारे ३५ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला २२ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *