Breaking News
चिपळूण : फणस काढताना झाडावरून पडल्याने व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा

चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते परिसरात रेल्वे अपघातात खेड तालुक्यातील ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (१० जुलै) सकाळी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.५५ वाजण्याच्या सुमारास कळंबस्ते येथील रेल्वे कि.मी. क्रमांक १३०/१६ येथे एर्नाकुलमहून ओखाकडे जाणाऱ्या ओखा एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १६३३८) या रेल्वेची धडक लागून दिलीप गंगाराम चांदे (वय ६२, रा. मुसाड, चांदेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद चिपळूण पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू (आ.मृ. क्र. ४२/२०२६) म्हणून करण्यात आली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *