Breaking News
चिपळूण : फणस काढताना झाडावरून पडल्याने व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : ओखा एक्स्प्रेसची धडक बसून खेड तालुक्यातील 62 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू चिपळूण : सावर्डे रेल्वे स्थानकावर प्रवासी पादचारी उड्डाणपुलाला मंजुरी, प्रवासी संघटना व आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम दापोलीत पुन्हा खळबळ POCSOचा गंभीर गुन्हा दाखल, अल्पवयीन मुलगी गर्भवती, जुलै महिन्यात दापोली तालुक्यात नोंद झालेला हा चौथा गुन्हा

मंडणगड : खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगडमध्ये भव्य शैक्षणिक साहित्य वाटप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने भव्य कार्यक्रम

banner 468x60

रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंडणगड शहराध्यक्ष साईराज सावंत यांच्या पुढाकाराने शुक्रवार, दि. १० जुलै २०२६ रोजी मंडणगड येथील जिल्हा परिषद मराठी शाळा, गांधी चौक येथे भव्य शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. शिक्षण हीच समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्याची मदत मिळाल्यास त्यांच्या शिक्षणाला अधिक बळ मिळते, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

banner 728x90

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंडणगड तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम, माजी नगरसेवक दिनेश लेंडे, माजी पंचायत समिती सभासद पोस्टुरे, स्थानिक ग्रामस्थ सुधीर हातमकर, व्यापारी गणेश सावर्डेकर, पालक समितीचे सर्व सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना नियमित शिक्षण घेण्याचे, मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि यश मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली.

खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याची परंपरा जपली जात असल्याचे सांगत उपस्थितांनी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच हा स्तुत्य उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष साईराज सावंत आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचे उपस्थितांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *