रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात बाणकोट खाडी परिसरात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिपोळे ते उमरोली जेटी दरम्यान सावित्री नदी व बाणकोट खाडीच्या खाजन भागात हा मृतदेह गुरुवारी (९ जुलै) दुपारी आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील पुरुष असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह उपडा अवस्थेत पाण्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बाणकोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ०३/२०२६ दाखल करण्यात आला असून नोंद ९ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०१ वाजता करण्यात आली.
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवाल व पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी बाणकोट पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













