दापोली तालुक्यातील खडपकरवाडी, दाभोळ येथे आज, दिनांक ४ जुलै २०२६ रोजी A1 जलफायटर प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत टी.टी. (टिटॅनस) लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला.


या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, दाभोळ येथील डॉ. प्रिया तसेच वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना मोफत टी.टी. लसीकरण करण्यात आले. यावेळी आरोग्याविषयी जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.


A1 जलफायटर प्रतिष्ठानच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करून कौतुक केले. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज खडपकर, सर्व सभासद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भविष्यातही अशाच आरोग्यविषयक व जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













