संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे आज गुरुवारी सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचा अपघात झाला. आरवली उड्डाणपुलाच्या अलीकडे आल्यानंतर चालकाने ब्रेक लावताच कंटेनरचा ताबा सुटून तो घसरला.
या अपघातात कंटेनरचा मागील भाग रस्त्याच्या साईड वॉलवर आडवा झाला, तर पुढील इंजिनचा भाग पुलाखालून जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर उतरला. अपघाताचे स्वरूप गंभीर असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
संबंधित कंटेनर रिकामा होता. मात्र, कंटेनर महामार्गावर आडवा झाल्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी मंदावली. घटनास्थळी पोलिस व संबंधित यंत्रणा दाखल होऊन कंटेनर हटविण्याचे तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ब्रेक लावल्यानंतर कंटेनर घसरल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













