Breaking News
खेड : अस्तानमध्ये बिबट्याचा वावर,शाळेच्या परिसरातही बिबट्याचा वावर; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर दापोली : आझाद मैदानावर भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर गणपती झाले आता, दिवाळीसाठी गावाला जा विशेष ट्रेनने कोकण रेल्वे मार्गावर 12 विशेष ट्रेन, वाढत्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा निर्णय रत्नागिरी : गणवेशाची कॉलर पकडून होमगार्डचा गळा दाबला, जीवे मारण्याची धमकी, लखन चिकोडीकर विरोधात गुन्हा दाखल, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान कुवारबांव येथे प्रकार खेड : तालुक्यात 28 सप्टेंबरला ‘सेवा संकल्प अभियान’, 11 महसूल मंडळांत विशेष शिबिरे

संगमेश्वर : किरकोळ कारणावरून मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथे दुचाकी सावकाश चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणी सहा जणांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस माहितीनुसार, ही घटना ७ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या दरम्यान कोंडीवरे दख्खन मोहल्ला परिसरात घडली. फिर्यादी अब्दुल सलाम अब्दुल सतार कापडी (वय ५०, रा. कोंडीवरे कापडी मोहल्ला, ता. संगमेश्वर) हे गावातील रस्त्यावर दुचाकी थांबवून काही व्यक्तींशी बोलत उभे होते. त्यावेळी आरोपी जावेद अली सय्यद हा भरधाव वेगाने दुचाकी चालवत जात असल्याने फिर्यादी यांनी त्याला सावकाश वाहन चालवण्यास सांगितले.


यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संबंधित आरोपी तेथून निघून गेला. काही वेळाने फिर्यादी घरी जात असताना आरोपी फैजान अब्दल शेख याच्यासोबत पुन्हा बाचाबाची झाली. वाद वाढत असताना सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी जावेद अली सय्यद, अब्दुल अली सय्यद, अलियान अब्दुल सय्यद, नय्यर असल शेख आणि तहसिम अब्दुल सय्यद हे एकत्र आले.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, सर्व आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून त्यांना हाताने चेहरा व तोंडावर मारहाण केली तसेच आई-बहिणीवरून शिवीगाळ केली.

या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १८९(२), १९०, १९१(२), ११५(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *