रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी 6 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल

banner 468x60

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. या मतदारसंघातून एकूण ६ उमेदवारांनी १२ नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून मंगळवारी अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.

banner 728x90

३० मे रोजी जुईली महेंद्र दळवी (अपक्ष) यांनी एक नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सुरेंद्रनाथ यशवंत माने (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी ४, अरविंद पुंडलिक म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, मानसी संतोष म्हात्रे (पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया) यांनी १, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) यांनी १ आणि अनिकेत सुनील तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी) यांनी ४ नामनिर्देशन पत्रे दाखल केली.

यामुळे एकूण ६ उमेदवारांची १२ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. मंगळवारी अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर अंतिम निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोकणातील या महत्त्वाच्या विधान परिषद निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *