Breaking News
हर्णेमध्ये मारहाण : दापोलीत तणावाचे वातावरण, कनकदुर्ग किल्ला परिसरातील वादानंतर हर्णे, दापोलीत रास्ता रोको; दोघांवर जीवघेणा हल्ला दापोलीच्या साक्षी पाते यांचा महाराष्ट्रात डंका, ‘AWPL’ कडून ‘काठमांडू-नेपाळ’ टूर बहुमान पटकावला रत्नागिरी : जयगड समुद्रात इंधनाचा मोठा साठा जप्त, ‘शहाना’ बोटीसह पाच जण ताब्यात चिपळूण : गाडी बाजूला घ्या” म्हणताच वाद, चिपळूणात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून मारहाण, पार्किंगच्या कारणावरून हिंसक हल्ला, बाळू चव्हाण आणि सुयोग चव्हाण दोघांविरोधात गुन्हा दाखल दापोली-खेडमधील वीज समस्यांवर उपाययोजना; नवीन विद्युत उपकेंद्रांसाठी राज्यमंत्री योगेश कदम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हर्णेमध्ये मारहाण : दापोलीत तणावाचे वातावरण, कनकदुर्ग किल्ला परिसरातील वादानंतर हर्णे, दापोलीत रास्ता रोको; दोघांवर जीवघेणा हल्ला

banner 468x60

दापोली तालुक्यातील हर्णे येथील कनकदुर्ग किल्ला परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या वादानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णे येथील बाजारपेठ मोहल्ल्यातील २ ते ३ युवक कनकदुर्ग किल्ला परिसरात मंगळवारी रात्री 11 ते 11:30 दरम्यान धूम्रपान व मद्यपान करत असल्याच्या संशयावरून दोन गटांमध्ये वाद झाला, सुरू झालेला हा वाद पुढे दोन समाजांतील युवकांमधील संघर्षात परिवर्तित झाल्याची माहिती समोर येत आहे.

banner 728x90

हा वाद 26 मे रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास झाला होता. मात्र, याच घटनेचा राग मनात धरून 27 मे रोजी संध्याकाळी ज्या युवकांनी धूम्रपान करण्यास विरोध केला होता त्या चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांच्यावर 25 ते 30 युवकांच्या समूहाने हल्ला केला आहे. या मारहाणीत दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले असून परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कनकदुर्ग किल्ला परिसरात काही युवक धूम्रपान व मद्यप्राशन करत असल्याचे पाहून चिन्मय गुरव आणि महेंद्र रघुवीर यांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर बुधवारी मोठा समूह एकत्र येत दोघांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या मारहाणीत चिन्मय गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. महेंद्र रघुवीर यांच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी हर्णे परिसरात रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी ४ ते ५ संशयितांना ताब्यात घेत अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बकरी ईदच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेमुळे दापोली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, “हल्लेखोरांना अटक झाल्याशिवाय माघार घेणार नाही,” अशी भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *