दापोलीच्या साक्षी पाते यांचा महाराष्ट्रात डंका, ‘AWPL’ कडून ‘काठमांडू-नेपाळ’ टूर बहुमान पटकावला

banner 468x60

दापोली तालुक्यातील निगडे येथील साक्षी संतोष पाते हिने आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. Asclepius Wellness Private Limited अर्थात ‘AWPL’ संस्थेकडून आयोजित करण्यात आलेली बहुप्रतिक्षित ‘काठमांडू-नेपाळ’ टूर जिंकण्यात तिला यश आले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे दापोली तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आयुर्वेद प्रसार आणि रोजगाराची सांगड

‘AWPL’ ही संस्था देशभरात आरोग्य आणि आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करण्यासोबतच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करते. संस्थेकडून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन म्हणून विशेष सहली आणि परदेश दौऱ्यांचे बक्षीस दिले जाते.

याच उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेली अत्यंत प्रतिष्ठेची ‘काठमांडू (नेपाळ)’ टूर महाराष्ट्रातून सर्वप्रथम जिंकण्याचा बहुमान साक्षी पाते हिने मिळवला आहे.

शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी

साक्षी सध्या एमबीएचे शिक्षण घेत असून शिक्षण सांभाळत तिने आरोग्य क्षेत्रात आणि आयुर्वेद प्रसारात सक्रिय योगदान दिले आहे. तिच्या मेहनतीने आणि जिद्दीने ग्रामीण भागातील तरुणाईसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.

सर्व स्तरांतून कौतुक

निगडे गावातील साक्षीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील एका तरुणीने राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवणे ही दापोलीकरांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

उच्च शिक्षण घेत असतानाच आरोग्य क्षेत्रात सक्रिय काम करत एवढे मोठे यश संपादन केल्याबद्दल साक्षी पाते हिचे त्रिवार अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *