चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेत कार्यरत असलेल्या ३३ वर्षीय मुकुंद मुरलीधर पालांडे यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. बेपत्ता झाल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह कोलकेवाडी येथील हसरेवाडी स्मशानभूमी लगत धरण परिसरात आढळून आला.

या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, बेपत्ता होण्यापूर्वी मुकुंद यांनी लिहून ठेवलेल्या चार पानी सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यात आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावेही नमूद करण्यात आली होती.

या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, बेपत्ता होण्यापूर्वी मुकुंद यांनी लिहून ठेवलेल्या चार पानी सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींवर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यात आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची नावेही नमूद करण्यात आली होती.
मुकुंद पालांडे हे चिपळूण शहरातील HDFC बँकेच्या शाखेत कार्यरत होते. २२ मे रोजी दुपारनंतर ते अचानक संपर्काबाहेर गेले. कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; मात्र कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर पोलिसांत बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या बेपत्ता होण्यापूर्वी लिहिलेली चार पानी सुसाईड नोट समोर आली आणि प्रकरणाने गंभीर वळण घेतले.

या सुसाईड नोटमध्ये मुकुंद यांनी मानसिक त्रासाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या काही व्यक्तींची नावे स्पष्टपणे लिहिल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या नोटला तपासाचा महत्त्वाचा धागा मानून चौकशी सुरू केली होती.
मुकुंद यांच्या शोधासाठी पोलिसांसह स्थानिक नागरिकांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर तीन दिवसांनी कोलकेवाडी धरण परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह सापडल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान, सुसाईड नोटमधील उल्लेखाच्या आधारे अलोरे-शिरगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील करीत आहेत.
या घटनेमुळे चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत असून, नेमक्या कोणत्या कारणामुळे मुकुंद यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून सुसाईड नोट, मोबाईल कॉल रेकॉर्ड तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात असून, तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













