संगमेश्वर : आंबा घाटातील अपघातातील रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील गोवरेवाडी बसथांब्याजवळ आज पहाटे झालेल्या भीषण रिक्षा अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश शामराव साळोखे (वय ६६) असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे आंबा घाट परिसरात रिक्षाचा अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेश साळोखे यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर साखरपा पोलीस अधिक तपास करत असून आंबा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करण्यात येणार आहे.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून साखरपा पोलीस घटनाबाबत बारकाईने तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *