Breaking News
दापोली : बंद घरात वृद्धेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह संगमेश्वर : आंबा घाटात एसटी बस आणि एर्टिका कारची समोरासमोर धडक; पाच जण जखमी दापोली : दादा इदाते यांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तकाचे मुंबई लोकभवन येथे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या हस्ते प्रकाशन, पद्मश्री दादा इदाते यांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी प्रवास इंग्रजीतून वाचकांसमोर राजापूर-संगमेश्वरात हॉटेल रजिस्टर चोरी प्रकरण : संशयितांची गाडी जप्त, सात मोबाईल आणि नऊ रजिस्टर पोलिसांच्या ताब्यात, ‘कर्नाटक गँग’चा पर्दाफाश लांजा : जुन्या वादाचा राग मनात धरून तरुणीवर हल्ला, घरात घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

चिपळूण : भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली, चालकाचा जागीच मृत्यू

banner 468x60

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथील यामाहा शोरूमसमोर शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय दुचाकी चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट महामार्गावरील सिमेंटच्या दुभाजकावर आदळल्याने हा अपघात घडला.

banner 728x90

महेश अरुण गुडेकर (वय ५०, रा. श्री समर्थनगर, सी-विंग, कापसाळ, डिगेवाडी, ता. चिपळूण) असे मृत दुचाकी चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश गुडेकर हे दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना वाहनाचा वेग जास्त असल्याने त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर दुचाकी रस्त्यावरून बराच अंतर घासत गेली आणि महामार्गाच्या डाव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या दुभाजकाला जोरदार धडकली.

अपघात इतका भीषण होता की, महेश गुडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

या प्रकरणी मृताचे भाऊ तथा रिक्षाचालक राजेंद्र अरुण गुडेकर (वय ५२, रा. काविळतळी, चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत चालकाविरुद्धच निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात वाहन चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


शनिवार, १६ मे रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला असून चिपळूण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *