चिपळूण : उद्योजक विजय उर्फ अण्णा कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

banner 468x60

उद्योजक विजय उर्फ अण्णा कदम यांनी १८ मे रोजी प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांचे स्वागत केले.

banner 728x90

“शतप्रतिशत भाजप” ही घोषणा घेऊन प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले असून, चिपळूण येथे आयोजित कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात विजय उर्फ अण्णा कदम यांनी भाजपच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी विजय कदम यांचे स्वागत करताना, “त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल. पक्षात त्यांना योग्य मानसन्मान दिला जाईल,” असा विश्वास व्यक्त केला.

चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी यांनीही कदम यांच्या प्रवेशामुळे चिपळूण परिसरात भाजप अधिक मजबूत होईल, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा कोषाध्यक्ष आशिष खातू, चिपळूण शहर प्रभारी विजय चितळे, जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य अभय चितळे, बँकिंग सेल संयोजक रत्नदीप देवळेकर, पंचायत राज व ग्रामविकास जिल्हा संयोजक नरेंद्र बेलवलकर, शहर उपाध्यक्ष निनाद आवटी, मीडिया जिल्हा संयोजक रुपेश आवले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल आंबेकर, शक्तिकुमार चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *