खेड : गळफास घेऊन 21 वर्षीय तरुणाची आत्महत्या

banner 468x60

खेड तालुक्यातील घाणेखुंट गवळवाडी येथील नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान (२१, मूळ रा. करमाळ – वेरा, खेजडिया ता. मारवाड, जि. राजस्थान) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

banner 728x90


या घटनेची खबर संजय मदनसिंह चौहान (३९) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. मयत नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान व खबर देणार हे हार्डवेअरच्या दुकानात एकत्रित काम करीत होते.

मंगळवार दिनांक १२ मे रोजी दुकानात मयत नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान हा आला नव्हता म्हणून लहान भाऊ सारखा फोन करीत होता, पण मोबाईल काही उचलत नव्हता, अखेर मित्राच्या वडिलांच्या मदतीने घरी जाऊन कोणत्यातरी हत्याराने कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला असता लाल रंगाच्या ओढणीच्या मदतीने पंख्याला गळफास लावून घेऊन मृतावस्थेत आढळुन आला. कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *