Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

दापोली : पिसई-विसापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात स्वराज्य प्रतिष्ठान आक्रमक, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिष निंबकर यांनी 1 जूनपासून दिला उपोषणाचा इशारा

banner 468x60

दापोली तालुक्यातील पिसई-विसापूर येथील एमएमआरडीए अंतर्गत सुरू असलेल्या मापोली-महाड मार्गावरील पिसई ते विसापूर रस्त्याच्या कामाविरोधात आता नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियम डावलून सुरू असल्याचा आरोप करत स्वराज्य प्रतिष्ठानने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

banner 728x90

या पार्श्वभूमीवर स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिष निंबकर, उपाध्यक्ष अजय कोळंबेकर आणि सचिव यतिन पेडणेकर यांनी येत्या १ जून २०२६ रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा देत तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पिसई ते विसापूर रस्त्याचे काम करताना कोणत्याही तांत्रिक निकषांचे पालन केले जात नसून संबंधित विभागाचे अधिकारी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. मातीकामावर योग्य पद्धतीने खडीकरण, रोलर फिरविणे आणि आवश्यक प्रक्रिया न पाळताच काम सुरू असल्याने रस्त्याचा दर्जा धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच कामासाठी वापरण्यात येणारे पाणी टँकर चालकांकडे आवश्यक परवाने नसल्याचा आरोप करण्यात आला असून काही चालक मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीसाठी करण्यात आलेले डायव्हर्शन अत्यंत अरुंद असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याची लेव्हल समतोल नसल्यामुळे वाहनांच्या डिझेल टाक्या आणि इंजिनला धक्के बसत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्याची उंच-सखल पातळी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रस्त्याच्या कामाच्या चुकीच्या नियोजनामुळे स्थानिक दुकानदार आणि व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून श्वसनाचे विकार वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या सर्व प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी तसेच काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी स्वराज्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा १ जूनपासून उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *