Breaking News
दाभोळ : महाडिक स्टॉप ते कोळथरे रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात, “कोकण कट्टा न्यूजच्या” वृत्ताची दखल चिपळूण : गडनदी-जामदा प्रकल्पातील देयक प्रकरणी कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित मंडणगड : रिक्षा-रुग्णवाहिका मिळेना मध्यरात्री महिलेची प्रकृती गंभीर, ‘112’ नंबरच्या कॉलवर मंडणगड पोलिसांची धावपोलिसांची तत्परता महिलेला ठरली जीवनदायी संगमेश्वर : तीन आमरण उपोषणे, 69 वर्षीय वृद्धाची आत्मदहनाच्या इशाऱ्याची पुनरावृत्ती; तरीही कुळाच्या जमिनीचा न्याय कागदावरच, देवरुख तहसीलदारांच्या आदेशाची अंमलबजावणी रखडली, निर्णय न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दापोली : मद्यधुंद अवस्थेत ईको कार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा

रत्नागिरी : पानवल येथे दुचाकी अपघातात 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू

banner 468x60

रत्नागिरी–हातखंबा मार्गावर पानवल येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जयसूर्या शांताराम मांडवकर (रा. कापडगाव, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.


banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास पानवल येथील मलुष्टे यांच्या बागेसमोर घडली. जयसूर्या मांडवकर हा स्वतःच्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न (क्र. MH-08-AY-2007) या दुचाकीवरून रत्नागिरीकडून हातखंबाच्या दिशेने जात होता.

दरम्यान, भरधाव वेगात वाहन चालवत असताना त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. परिणामी, दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट ब्लॉकवर जोरात आदळली. या भीषण अपघातात जयसूर्या याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. दुचाकीचा वेग जास्त असल्याने अपघात प्राणघातक ठरल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रुपेश रघुनाथ भिसे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी मृत जयसूर्या मांडवकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

घटनेचा अधिक तपास रत्नागिरी ग्रामीण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *