रत्नागिरी : जिल्ह्यात 18 एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू; कायदा-सुव्यवस्थेसाठी प्रशासनाची पावले

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत ४ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केला आहे. प्र. अपर जिल्हादंडाधिकारी विश्वजीत गाताडे यांनी हा आदेश जारी केला आहे.

banner 728x90

या आदेशानुसार, संबंधित कालावधीत कोणत्याही व्यक्तीस हत्यारे बाळगणे, स्फोटक किंवा दाहक पदार्थ जवळ ठेवणे, भडकाऊ किंवा तणाव निर्माण करणारी भाषणे करणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी परवानगीशिवाय एकत्र येण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

जिल्ह्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले असून, कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे तसेच शासकीय कार्यक्रमांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. मात्र, मोर्चा, आंदोलन किंवा सार्वजनिक सभा आयोजित करण्यासाठी संबंधित प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत नियमांचे पालन करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *