रत्नागिरी : शहरासह परिसरात भूकंपाचे धक्के

banner 468x60

रत्नागिरी शहरासह परिसरात गुरुवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री ८ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास हे धक्के बसल्याने काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. तर हरचेरी परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील काही भागांत अचानक जमिनीला हलके हादरे बसल्याची जाणीव नागरिकांना झाली. हे धक्के काही सेकंद जाणवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपाची तीव्रता कमी असली तरी केंद्रबिंदू जमिनीच्या तुलनेने जवळ असल्याने धक्के स्पष्टपणे जाणवल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *