रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती-उपसभापती पदांसाठी शिवसेनेची नावे जाहीर, सर्व यादी पाहा

banner 468x60

रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही नावे निश्चित करण्यात आली आहेत.

सोमवारी (९ मार्च) होणाऱ्या निवड प्रक्रियेनंतर संबंधित उमेदवार अधिकृतपणे पदभार स्वीकारणार आहेत. पक्षाच्या आदेशानुसार प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांना संधी देण्यात आली असून ही पदे सुरुवातीच्या सव्वा वर्षांसाठी राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

तालुकानिहाय नावे पुढीलप्रमाणे

मंडणगड
• . प्रणाली संदेश चिले – सभापती
• . दिपक शंकर मालुसरे – उपसभापती

खेड
• . आफिया नजीब पालेकर – सभापती
• . सुनील बाबाराम मोरे – उपसभापती

दापोली
• उन्मेष रामचंद्र राजे – सभापती
• . नम्रता प्रदीप तोडणकर – उपसभापती

चिपळूण
• . संदेश मनोहर आयरे – सभापती

गुहागर
• . प्रणव प्रमोद पोळेकर – सभापती

देवरुख (संगमेश्वर)
• . शर्वरी प्रथमेश वेल्ये –सभापती

रत्नागिरी
• . प्रविण धोंडू पांचाळ – सभापती
• . गजानन धर्माजी धनावडे – उपसभापती

राजापूर
• . नंदिनी नितीन कदम – सभापती
• . अभिजित यशवंत गुरव – उपसभापती

लांजा
• . मानसी सिद्धेश्वर आंबेकर – सभापती
• . आदेश दत्तात्रय आंबोळकर – उपसभापती

या घोषणेनंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरणात उत्सुकता निर्माण झाली असून सोमवारी होणाऱ्या निवड प्रक्रियेनंतर अधिकृत घोषणा होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *