दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या दोन वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे व सचिव मिलिंद शेठ यांच्या पुढाकारातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच दापोली तालुका व्यापारी संघटनेचा महिला विभाग स्थापन करण्यात आला आहे.
दापोली तालुक्यातील उद्योगिनी महिलांचे एकत्रीकरण करण्यासाठी ५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अंकुर प्राईम येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला दापोली तालुक्यातील विविध गावांतील उद्योगिनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या सभेला दापोली तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विनोद आवळे, सचिव मिलिंद शेठ तसेच राहुल मंडलिक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना मिलिंद शेठ यांनी संघटनेची उद्दिष्टे स्पष्ट करताना सांगितले की, दापोली तालुक्यातील पुरुष व्यापाऱ्यांबरोबरच महिला देखील खांद्याला खांदा लावून उद्योग सांभाळत आहेत. काही क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतंत्र असा ठसा उमटवला आहे. महिलांना समान संधी, त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देणे तसेच दापोली तालुक्यातील उद्योग व्यवसायाला नवी उभारणी देणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष विनोद आवळे यांनी सर्व महिला उद्योजकांना शुभेच्छा देत दापोली तालुका व्यापारी संघटनेच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महाराष्ट्रातील अग्रेसर महिला व्यापारी संघटना उभी करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्यांनी नमूद केले.
नवनिर्वाचित अध्यक्षा कविता मालू यांनी सर्वांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचे आश्वासन दिले. तर सचिव अस्मिता परांजपे यांनी महिलांना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अध्यक्ष विनोद आवळे व सचिव मिलिंद शेठ यांचे आभार मानले. यावेळी उपस्थित अनेक उद्योगिनी महिलांनीही आपली मनोगते व्यक्त करत अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
दापोली तालुका महिला व्यापारी संघटना कार्यकारिणी :
अध्यक्ष – कविता मालू
उपाध्यक्ष – अपर्णा बुटाला, सुजाता दाभोळे
सचिव – अस्मिता परांजपे
सहसचिव – वैष्णवी कदम, अस्मिता हांडे
खजिनदार – आश्लेषा फाटक
सहखजिनदार – मधुरा तलाठी
विश्वस्त – नेहा शिगवण, माधुरी विचारे, मक्सुदा डबीर
सदस्य :
मिताली चांदोरकर, विद्या झगडे, मनस्वी मेहता, गोमती अमृते, मिनल लिमये, आचल पिल्ले, प्रणाली वालावलकर, गीता राऊत, स्वरदा विचारे, अक्षया मेहता.
पंचक्रोशी प्रतिनिधी :
दाभोळ – साधना महाजन, राखी तोडणकर, तृप्ती गुजर
बुरोंडी – नेहा मयेकर, रिया कासेकर
मुरुड – सुप्रिया गाडगीळ, रेणु सावंत
हर्णे – अर्पिता पतंगे
पालगड – निशिता शिंदे, सुनिता शेठ
वाकवली – केतकी गावडे
गावतळे – पूजा चहाण, रोहिणी म्हाब्दी.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















