दापोली : करंजाणी बसथांब्यावरून तरुणाचे अपहरण; पैशांच्या वादातून मारहाण, चौघांवर गुन्हा

banner 468x60

दापोली तालुक्यातील करंजाणी येथे बसथांब्यावर उभ्या असलेल्या तरुणाचे पैशांच्या देवघेवीच्या वादातून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौराबाई बसवराज पवार (वय ५०, रा. करंजाणी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा किरण बसवराज पवार (वय ३०) याचे संशयितांनी अपहरण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटना ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. किरण पवार हा करंजाणी बसथांब्यावर उभा असताना संशयित शब्बीर मांडलेकर (वय ६०) याच्यासह जिशान शब्बीर मांडलेकर (२८), सुबान शब्बीर मांडलेकर (२१) आणि सरजीन लियाकत मांडलेकर (१८, सर्व रा. म्हाप्रळ, ता. मंडणगड) तसेच अन्य तिघेजण तेथे आले.

संशयितांनी किरण पवार याला “तू पैसे दिले नाहीस तर तुला मारून टाकू” अशी धमकी देत जबरदस्तीने मोटारीत बसवले. त्यानंतर पैशांची मागणी करत त्याला मारहाण करण्यात आली, असे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *