दापोली पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत जालगाव येथील पांगारवाडी परिसरात मोठी कारवाई करत गांजाचे सेवन करणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. राजेंद्र अनंत घाग (रा. पांगारवाडी, जालगाव, ता. दापोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बळीराम बालाजी चोंडे आणि त्यांच्या पथकाला पांगारवाडी परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पांगारवाडी येथील घर क्रमांक ४५३ येथे छापा टाकला.
या छाप्यात आरोपी राजेंद्र घाग हा गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांना रंगेहाथ आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गांजाचे सेवन केल्याची कबुली दिली.
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी संहिता १९८५ अंतर्गत कलम ८(अ) व २७ नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रात्री सुमारे ११.३० वाजेपर्यंत सुरू होती.
दापोली परिसरात अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढील काळातही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















