रत्नागिरी जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण झालेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. इंधन दरात कोणताही बदल झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मध्यपूर्व आशिया, अमेरिका, युरोपियन खंड तसेच आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी इंधनटंचाईबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊन पेट्रोल पंप आणि सीएनजी स्टेशनवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून साठा व वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. संबंधित कंपन्यांकडून नियमित आणि सुरळीत पुरवठा सुरू असल्याची खात्री देण्यात आली आहे.
सलग सुट्ट्या, होळी सण आणि पर्यटन हंगामामुळे काही पेट्रोल पंपांवर तात्पुरती गर्दी झाली असली तरी जिल्ह्यातील सर्व पंप आणि गॅस एजन्सींमधून इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















