अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे मिडल ईस्ट देशांमध्ये अनेक भारतीय अडकून पडल्याचे चित्र आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक परिस्थिती तणावपूर्ण झाली असून अनेक जण चिंतेत आहेत.
अशा अस्थिर वातावरणात मात्र दापोलीकरांची माणुसकी आणि एकजूट दुबईत पाहायला मिळाली. दापोलीकर ही केवळ भौगोलिक ओळख नाही, तर ती जिव्हाळा, आपुलकी आणि संकटात धावून जाण्याची परंपरा आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. जळगावचे सरपंच अक्षय फाटक यांनी दुबईहून सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. परदेशात, आपल्या माणसांपासून दूर अशा अवस्थेत त्यांची परिस्थिती पाहून अनेकांच्या मनात काळजी निर्माण झाली. परिस्थितीची जाणीव होताच दुबईत राहणारे साजिद कागदी आणि रहीमान चिपळूणकर यांनी तत्काळ त्यांच्याशी संपर्क साधला.

कोणताही विलंब न करता त्यांचा संपर्क क्रमांक मिळवण्यात आला आणि प्रत्यक्ष भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार साजिद कागदी आणि रहीमान चिपळूणकर यांनी दुबईतील त्यांच्या हॉटेलवर जाऊन अक्षय फाटक यांची भेट घेतली, भेट घेऊन त्यांना दिलासा दिलाय. भेटीदरम्यान त्यांच्या परिस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. त्यांच्या मनातील भावना, गरजा आणि अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी त्यांना एकच दिलासा देण्यात आला “आपण एकटे नाही आहात. कोणतीही मदत लागली, कोणत्याही प्रकारचे सहकार्य हवे असल्यास आम्ही आपल्या पाठीशी आहोत.” ही भेट केवळ एका व्यक्तीला धीर देण्यासाठी नव्हती, तर दापोलीकरांच्या संस्कृतीची आणि एकजुटीची जाणीव करून देणारी होती. आपण कुठेही असलो, कितीही दूर असलो तरी आपल्या माणसासाठी उभे राहणे, त्याला मानसिक आधार देणे आणि संकटात साथ देणे हीच खरी परंपरा आहे, हे या कृतीतून अधोरेखित झालीय.
संकटाच्या काळात शब्दांपेक्षा उपस्थिती महत्त्वाची असते. आणि हीच उपस्थिती माणुसकीची खरी ओळख ठरते. दापोलीकरांची ही एकजूट आणि मदतीसाठी तत्परता भविष्यातही अशीच कायम राहो, हीच अपेक्षा.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















