रत्नागिरी शहरातील बाजारपेठ परिसरातील मच्छी मार्केट येथील एका ५८ वर्षीय व्यावसायिकाचा अचानक झालेल्या उलट्यांच्या त्रासामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अशरफ अब्दुलहमीद झारी (वय ५८, रा. फातिमा अपार्टमेंट, रूम नं. ११, बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशरफ झारी हे रविवारी, १ मार्च रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मच्छी मार्केटमधील आपल्या ‘वेलकम हलाल चिकन सेंटर’ या दुकानात बसले होते. त्यावेळी त्यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला. “मला त्रास होत असून मी उपचारासाठी दवाखान्यात जातो,” असे दुकानातील कामगार अनंत कांबळे यांना सांगून ते घरी निघून गेले. मात्र, घरी गेल्यानंतर त्यांच्या उलट्यांचा त्रास अधिकच वाढला. प्रकृती खालावल्याचे पाहून त्यांचा मुलगा मन्नान झारी व त्यांच्या पत्नीने त्यांना तातडीने सकाळी ७:४५ वाजता जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून सकाळी ८:३० वाजता मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक २५/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. कलम १९४ नुसार करण्यात आली आहे. मन्नान झारी यांनी यासंदर्भात पोलिसांत खबर दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













