परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी

banner 468x60

मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार यांच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.

banner 728x90 banner 728x90

या अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवैत, बाहरीन, ओमान (मस्कत), जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा. दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक त्या सूचना जारी केल्या जात आहेत.

महाराष्ट्र शासन यांच्या वतीने परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सतर्क असून केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय साधत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

📞 आपत्कालीन संपर्क तपशील

रामल्ला (पॅलेस्टाईन)
फोन: +970592916418
ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार)
फोन: 00974-55647502
ईमेल: cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया)
फोन: 00-966-11-4884697
WhatsApp: 00-966-542126748
टोल फ्री: 800 247 1234
ईमेल: cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल)
फोन: +972-54-7520711 / +972-54-2428378
ईमेल: cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण)
फोन: +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)
टोल फ्री: 800-46342
WhatsApp: +971543090571
ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत
फोन: +96565501946
ईमेल: community.kuwait@mea.gov.in

बाहरीन
फोन: 00973-39418071

मस्कत (ओमान)
टोल फ्री: 80071234
WhatsApp: +96898282270
ईमेल: cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन
फोन: 00962-770 422 276

बगदाद (इराक)
फोन: +964 771 651 1185 / +964 770444 4899
वेबसाइट: eoibaghdad.gov.in
ईमेल: cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

🔗 अधिकृत माहिती/अपडेट्स:
https://x.com/i/status/2027746402575782262

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *