दापोली : रस्त्यात पोल की रस्ता बाहेर? दापोलीकर विचारतायात – ‘वाह क्या कारीगरी है! किसने बनाया ये मुजस्समा?

banner 468x60

दापोली शहरातील नर्सरीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण प्रशासनाने पूर्ण केले असले, तरी नियोजनाअभावी हा रस्ता आता वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरत आहे. ओम साई हॉटेल, बाबू हेदुकर यांच्या हॉटेलसमोर असलेला एक विजेचा खांब थेट रस्त्याच्या मध्यभागी उभा असल्याने अपघाताला निमंत्रण देत आहे. हा खांब तातडीने हटवावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

banner 728x90 banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, रस्ता रुंद झाल्यानंतर बहुतांश विजेचे खांब रस्त्याच्या कडेला हलवण्यात आले आहेत. मात्र, ओम साई हॉटेलसमोरील एक खांब अद्यापही तसाच ठेवण्यात आला आहे. परिणामी, हा खांब थेट रहदारीच्या मार्गात येत असून, वाहनचालकांना त्याभोवती कसरत करत मार्ग काढावा लागत आहे.

या मार्गावरून शाळकरी मुले, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळी खांब नीट दिसत नसल्यास मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

“रस्ता चांगला झाला, पण हा खांब जीवावर उठणारा ठरत आहे. प्रशासनाने तो तात्काळ बाजूला करावा,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.
या प्रकाराकडे महावितरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *